कार्यालयात जाऊन महिलेला मारहाण

0
193

दि. 1 ऑगस्ट (पीसीबी) पिंपरी,
कार्यालयात जाऊन तीन महिलांनी मिळून एका महिलेला बेदम मारहाण केली. ही घटना मंगळवारी (दि. 30) सायंकाळी सव्वा सहा वाजता झिरो बॉईज चौक, संत तुकाराम नगर, पिंपरी येथे घडली.

याप्रकरणी 36 वर्षीय महिलेने पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार तीन महिलांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला त्यांच्या उंबरकर कन्सलटन्सी आणि सर्विसेस या कार्यालयात होत्या. त्यावेळी आरोपी महिला त्यांच्या कार्यालयात आल्या. त्या महिलांनी फिर्यादीस लाथाबुक्क्यांनी मारहाण करून शिवीगाळ व दमदाटी केल्याचे फिर्यादीत नमूद आहे. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.