कार्यकारी अभियंता मनोज सेठिया यांना सह शहर अभियंतापदी बढती

0
276

पिंपरी दि. १४ (पीसीबी) – पिंपरी- चिंचवड महापालिकेतील कार्यकारी अभियंता मनोज सेठिया यांना सह शहर अभियंतापदी बढती देण्यात आली आहे. तर, सुरक्षा अधिकारी उदय जरांडे यांना सुरक्षा विभागाचे विभागप्रमुख करण्यात आले आहे.

भाजपा शहराध्यक्ष, आमदार महेश लांडगे यांनी महापालिकेतील महत्वाच्या पदांवर राज्य शासनाचे अधिकारी नियुक्त न करता महापालिका प्रशासनातील अनुभवी अधिकाऱ्यांना पदोन्नतीद्वारे संधी द्यावी, अशी मागणी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती. तसेच, महापालिका प्रशासक व आयुक्त शेखर सिंह यांनाही पत्राद्वारे सूचित केले होते.

आमदार लांडगे यांच्या मागणीची दाखल घेत महापालिका प्राशसनाने स्थापत्य विभागाचे कार्यकारी अभियंता मनोज सेठिया यांना सह शहर अभियंतपदी पदोन्नती दिली आहे. त्यानुसार कामकाज वाटपाचे आदेशही निगर्मीत करण्यात आले आहेत. पिंपरी- चिंचवड महानगरपालिका आस्थापनेवर ‘सह शहर अभियंता’ (स्थापत्य विभाग) अभिनामाची पदे शासन मंजूर असून, रिक्त पद पदोन्नतीने भरण्याबाबत 12 ऑक्टोबर रोजी पदोन्नती समिती सभा आयोजित केली होती. या सभेत पदोन्नतीच्या निर्णयाला मान्यता देण्यात आली आणि गुरुवारी शेखर सिंह पदोन्नतीचे आदेश काढले.