कार्यकर्त्याने अन्नत्यागाचा निर्णय घेताच प्रशासनाला आली जाग, आयुक्तांनी दिले मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन

0
174

पिंपरी, दि. ३० (पीसीबी) – नागरिक कृती समितीच्या वतीने सामाजिक कार्यकर्ते संदीप जाधव हे ड्रेनेज, लाईट, पाणी, रस्ते, विकासासाठी दिनांक 26/4/2023 पासुन जीवची पर्वा न करता जीव धोक्यात घालून अन्न त्यागाचा धाडसी निर्णय घेतला होता त्यावेळी कृती समितीच्या अनेक कार्यकर्त्यांनी 28/4/2023 रोजी आयुक्त शेखर सिंह यांची भेट घेऊन सर्व व्यथा त्यांच्यापुढे मांडल्यानंतर अखेर महानगरपालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना स्वतः रुपीनगर मध्ये येऊन संदीप जाधव यांच्या मागण्यांना सकारात्मकपणे प्रतिसाद मिळाला.

सोमवार पासून संदीप जाधव / बळीराम जाधव यांनी सांगितलेल्या सूचनेनुसार सर्व कामे चालू होतील असे आश्वासन पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे सह शहर अभियंता संजय कुलकर्णी यांनी दिले. संदीप जाधव व बळीराम जाधव यांनी कुलकर्णी साहेबांच्या हस्ते लिंबू पाणी घेऊन आपले उपोषण मागे घेण्यात आले महानगरपालिकेचे कार्यकारी अभियंता अनिल राऊत, उपअभियंता शिवराज वाडकर, कनिष्ठ अभियंता अनिल भोईर, कनिष्ठ अभियंता अमोल दडस, त्यावेळी प्रामुख्याने उपस्थित शांताराम बापू भालेकर, इरफान भाई सय्यद, शिरीश उत्तेकर, दादा समगीर, राहुल पिंगळे, दादा सातपुते, भरत शिंदे, रवी शेतसंधी, बाप्पा जाधव, गणेश मगर, अतुल बेळे, पांडुरंग कदम, सतीश कंठाळे, अशोक कोकणे व रुपीनगर भागातील अनेक मान्यवर उपस्थित होते.