कार्यकर्त्यांनी गाफील न राहता सक्रीयपणे काम करावे – अजित गव्हाणे

0
229

वंचितच्या कार्यकर्त्यांसह शीख बांधवांचा राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये जाहीर प्रवेश

पिंपरी, दि. 24 (पीसीबी) – केंद्र व राज्य सरकारचे चुकीचे निर्णय जनतेपर्यंत पोहचवा. वाढती महागाई, इंधन दरवाढ, गॅसचे वाढत्या दरामुळे सर्वसामान्य नागरिकांचे जगणे बेहाल झाले असून नागरिकांमध्ये सरकारच्या कारभारावर रोष आहे. मतदार निवडणूकीची वाट बघत असून राज्य, केंद्र सरकारला मतदानातून घरचा रस्ता दाखविणार आहे. आगामी महापालिकेची निवडणूक कधी होईल, हे आताच सांगता येत नसले तरी पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी गाफील न राहता सक्रीयपणे पक्षाचे काम करावे, असे आवाहन राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी केले. यावेळी वंचित आणि शीख बांधवांनी राष्ट्रवादीमध्ये जाहीर प्रवेश केला. गव्हाणे यांनी त्यांचे पक्षात स्वागत केले.

चिखली येथे पार पडलेल्या मासिक सभेत शहराध्यक्ष गव्हाणे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना बोलत होते. यावेळी महिला शहराध्यक्षा कविता आल्हाट, युवक अध्यक्ष इम्रान शेख, माजी नगरसेवक राहुल भोसले, शाम लांडे, पंकज भालेकर, विनोद नढे, अरुण बोऱ्हाडे, संगीता ताम्हणे, धनंजय भालेकर, लता ओवाळ, सचिन औटे, सतीश दरेकर, तुषार कामटे, राजेंद्र साळुंखे, श्रीधर वाल्हेकर, देवेंद्र तायडे, मंगला जाधव, पंडित गवळी, ऍडव्होकेट गोरक्ष लोखंडे, दत्तात्रय जगताप, हरिभाऊ तिकोने, गोरक्ष पाषाणकर, वसंत बोराटे, तानाजी खाडे, मंदा आल्हाट, दत्तोबा लांडगे, सुरेखा लांडगे, उत्तम आल्हाट, संजय औसरमल, पल्लवी पांढरे, काशिनाथ जगताप, मनीषा गटकळ, सविता धुमाळ, कविता खराडे, उज्वला ढोरे, ज्योती तापकीर, संगीता जोशी, माधव पाटील, विशाल काळभोर, महेश झपके, निर्मला माने, राजेंद्र सिंग वालिया, ज्ञानेश्वर कांबळे, शीला भोंडवे, राजेश हरगुडे, सारिका हरगुडे, शिरीष साठे, सागर तापकीर, गणपत आहेर, गणेश सस्ते, सुदाम शिंदे, युवराज पवार, विजय पिरंगुटे, राजन नायर, एडवोकेट विशाल जाधव, संदीप तापकीर, विशाल आहेर, विकास साने, विष्णू शेळके, सोमनाथ मोरे, पांडुरंग लोखंडे, राजू खंडागळे, विजय घोडके, अक्षय माछरे, तानाजी जवळकर, दत्तात्रेय बनसोडे, माणिकराव जैद, निलेश निकाळजे, पोपट पडवळ, संतोष बरगुडे आदी उपस्थित होते.

गव्हाणे पुढे म्हणाले, महापालिकेत राष्ट्रवादीच्या सत्ता काळात विकास कामातून शहराचा चेहरा-मोहरा बदलला आहे. विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांचे शहरावर विशेष प्रेम आहे. त्यामुळेच दादांनी स्वतः लक्ष देऊन शहर विकास कामात परिपूर्ण केले आहे. मात्र, गेल्या पाच वर्षांत भाजपच्या सत्ता काळात शहराचा विकास खुंटला आहे. भाजपने पालिकेत पाच वर्षांत फक्त भ्रष्टाचार आणि भ्रष्टाचार असाच कारभार केल्याची टाकीही गव्हाणे यांनी केली.

यावेळी वंचितमधून सुहास देशमुख, केडी वाघमारे, बिरदेव मोटे, शाम कसबे, अण्णासाहेब पारे, किरण शेगोकार, सपना कदम, सुप्रिया जाधव, सुलभा हिंगे प्रवीण शिंदे, देवेंद्र गायकवाड तर शीख समाज बांधव जितेंद्र सिंग लोहेट, सविंदर सिंग बाला, मनोहर सिंग लोहेट, महेंद्रसिंग हंस, दिलबर सिंग गिल, महेंद्रसिंग जबाल यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला.