संगमनेर, दि. ०८ (पीसीबी) – अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर येथे पोलीस ठाण्यातून ४ कैदी पळाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कारागृहाचे गज तोडून हे चौघे बुधवारी पाहाटे फरार झाले आहेत. या घटनेनंतर पोलीस दलात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर शहर पोलीस ठाण्यातील कारागृहात ४ कैद्यांना ठेवण्यात आलं होतं. फरार झालेल्या कैद्यांवर बलात्कार, खून, दरोड्यासारख्या गंभीर गुन्ह्यांची नोंद होती. दरम्यान कैद्यांना पकडण्यासाठी पोलीसांची वेगवेगळी पथके रवाना करण्यात आली आहेत. दरम्यान गंभीर गुन्ह्यातील शिक्षा भोगत असलेले आरोपी कारागृहातून फरार झाल्याने आश्चर्य व्यक्त कें जात आहे.