कारवाई करू नये म्हणून पोलिसांना शिवीगाळ

0
36

पिंपरी, दि.11 (पीसीबी)
वाहनावर कारवाई करू नये म्हणून दुचाकी चालकाने थेट वाहतूक पोलिसांना शिवीगाळ केली. ही घटना मंगळवारी (दि. १०) सकाळी पुणे-मुंबई महामार्गावर खराळवाडी येथे घडली.

तुषार सुंदरबापू क्षीरसागर (वय ३०, रा. देहू) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस अंमलदार महिलेने पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी तुषार मंगळवारी सकाळी साडेअकरा वाजता दुचाकीवरून पुणे-मुंबई महामार्गावरून जात होता. खराळवाडी येथून साई चौकाकडे जाणाऱ्या रस्त्यावर पिंपरी वाहतूक पोलिसांनी त्याची दुचाकी अडवली. पोलिसांनी त्याच्या दुचाकीवर कारवाई करू नये यासाठी त्याने पोलीस महिलेला शिवीगाळ करून सरकारी कामात अडथळा निर्माण केला. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.