कारला धक्का लागल्याने बस चालकाला बेदम मारहाण

0
202

निगडी, दि. ११ (पीसीबी) – कारला धक्का लागला आहे, असे म्हणत आठ जणांनी मिळून ट्रॅव्हल्स बस चालक आणि त्याच्या साथीदाराला बेदम मारहाण केली. ही घटना रविवारी (दि. ९) रात्री दहा वाजता निगडी गावठाण येथे घडली.

बाळासाहेब फडणीस (वय ६७, रा. कोल्हापूर) यांनी याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार गणेश लुक्कर, पप्पू लुक्कर आणि त्याचे सहा साथीदार यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे वैभव ट्रॅव्हल्स कोल्हापूर या ट्रॅव्हल्स कंपनीत बस चालक म्हणून काम करतात. निगडी येथून कोल्हापूरसाठी बसमध्ये प्रवासी भरत होते. त्यावेळी बसच्या मागे असलेल्या कारमधील चौघांनी फिर्यादी यांना कारला बसचा धक्का लागला असल्याचे सांगत त्यांना शिवीगाळ करून हाताने मारहाण केली. त्यांनतर फिर्यादी यांचा साथीदार बंडू काळभोर यांनाही मारहाण केली. रस्त्यावरील ब्लॉक फिर्यादी आणि बंडू काळभोर यांना मारून जखमी केले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. निगडी पोलीस तपास करीत आहेत.