रावेत, दि. 18 (पीसीबी)
भरधाव वेगातील कारने धडक दिल्यामुळे दुचाकीस्वार जखमी झाला. ही घटना सोमवारी (दि. १६) सायंकाळी साडेसात वाजताच्या सुमारास भोंडवे कॉर्नर ते मुकाई चौक रस्त्यावर रावेत येथे घडली.
मिहीर अरविंद भेगडे (वय 28, रा. सुभाष चौक, तळेगाव दाभाडे) असे अपघातात जखमी झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. पोलिसांनी अंगद किरण देशपांडे (वय 38, रा. मासुळकर कॉलनी, पिंपरी) याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी मिहीर हे सोमवारी सायंकाळी साडेसात वाजताच्या सुमारास आपल्या दुचाकीवरून चालले होते. ते भोंडवे कॉर्नर ते मुकाई चौक दरम्यान असलेल्या रावेतमधील कोहिनूर सोसायटी जवळ आले असता त्यांच्या दुचाकीला आरोपी अंगत देशपांडे यांच्या कारने जोरदार धडक दिली. या अपघातात मिहीर हे गंभीर जखमी झाले. तसेच फिर्यादी यांच्या दुचाकीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. रावेत पोलीस याबाबत अधिक तपास करीत आहेत.