कारच्या धडकेत दुचाकीस्वार जखमी

0
500

चिखली, दि. २४ जुलै (पीसीबी) -भरधाव वेगात जाणाऱ्या कारने एका दुचाकीला धडक दिली. त्यात दुचाकीस्वार जखमी झाला. ही घटना शनिवारी (दि. 22) दुपारी तीन वाजताच्या सुमारास साने चौक ते म्हेत्रे गार्डनच्या परिसरात घडली.

सागर रायबा चव्हाण (वय 31, रा. रुपीनगर, तळवडे) असे जखमी व्यक्तीचे नाव आहे. त्यांनी याप्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार एमएच 12/युसी 6643 या क्रमांकाच्या कार चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे त्यांच्या दुचाकीवरून साने चौक ते म्हेत्रे गार्डनच्या दिशेने जात होते. त्यावेळी आरोपीने त्याच्या ताब्यातील कार भरधाव वेगात चालवून फिर्यादी यांच्या दुचाकीला धडक दिली. त्यात फिर्यादी रस्त्यावर पडले. यामध्ये ते गंभीर जखमी झाले. चिखली पोलीस तपास करीत आहेत.