कारच्या धडकेत दुचाकीस्वार गंभीर जखमी

0
327

भरधाव वेगात जाणाऱ्या कारने एका दुचाकीला धडक दिली. त्यात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला. ही घटना रविवारी (दि. 16) रात्री पावणे अकरा वाजता घरकुल कमानीजवळ, चिखली येथे घडली.

माणिक प्रकाश बामणे (वय 40) असे जखमी दुचाकीस्वराचे नाव आहे. याप्रकरणी बामणे यांच्या पत्नीने चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार कार (एमएच 43/बीजे 0628) चालक गणेश परमेश्वर दळवी (वय 21, रा. वडगाव बुद्रुक, ता. मुळशी) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे पती दुचाकीवरून घरी येत असताना घरकुल वसाहतीच्या कमानीजवळ आरोपीने त्याच्या ताब्यातील कार वेगात चालवून फिर्यादी यांच्या पतीच्या दुचाकीला धडक दिली. त्यात फिर्यादी यांचे पती गंभीर जखमी झाले आहेत. तसेच त्यांच्या दुचाकीचे नुकसान झाले आहे. चिखली पोलीस तपास करीत आहेत.