हिंजवडी, दि.22 (पीसीबी)
भरधाव कारच्या धडकेत एका दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी (दि. २०) माण येथे घडली.
प्रतीक विलास निकम (वय ३०) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी सुभाष मारुती निकम (वय ५१, रा. माण) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार कैलास गौतम खाडे (वय २९, रा. माण) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा पुतण्या प्रतीक निकम त्याच्या दुचाकीवरून जात होता. त्यावेळी त्यांच्या दुचाकीला आरोपी कैलास खाडे याने त्याच्या कारने धडक दिली. या अपघातात प्रतीक याचा मृत्यू झाला. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.