दुचाकीस्वार गंभीर जखमी
सांगवी, दि. 12 (पीसीबी)
विशालनगर येथे एका कारने दुचाकीला धडक दिली. यामध्ये दुचाकीस्वार बेशुद्ध झाला. हा अपघात गुरुवारी (दि. ९) दुपारी घडला.
नैना महेश निपाणे (वय ४१, रा. विशालनगर, पुणे) असे जखमी दुचाकीस्वाराचे नाव आहे. याप्रकरणी निपाणे यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार कार (एमएच १४/केजे ९१०२) चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी निपाणे हे त्यांच्या दुचाकीवरून गुरुवारी दुपारी कामाला जात होते. त्यावेळी एका कार चालकाने त्याच्या ताब्यातील कार अचानक डावीकडे वळवून निपाणे यांच्या दुचाकीला जोरात धडक दिली. यामध्ये निपाणे हे बेशुद्ध झाले. त्यांनी उपचार घेतल्यानंतर शनिवारी याबाबत गुन्हा नोंदवला आहे. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.