कारची दुचाकीला धडक दुचाकी स्वराचा मृत्यू

0
273

भरधाव कारने एका दुचाकीला धडक दिली. यामध्ये दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना रविवारी (दि. 28) मध्यरात्री सव्वा बारा वाजताच्या सुमारास हिंजवडी मान रोडवर बोडकेवाडी फाटा येथे घडली.

नवीन नरसम्मामारुती पैला (वय 29) असे मृत्यू झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. याप्रकरणी रामबाबू नागेश्वरराव वडलामोडे (वय 46, रा. महाळुंगे) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अभिषेक गौतमकुमार चॅटर्जी (वय 31, रा. माण, ता. मुळशी) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी चॅटर्जी याने त्याच्या ताब्यातील कारभार वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष करून चालवली. त्याने समोरून येणाऱ्या दुचाकीला धडक दिली. या अपघातात दुचाकी वरील तरुण गंभीर जखमी होऊन मयत झाला. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.