शिरगाव, दि.1 (पीसीबी)
भरधाव कारने एका दुचाकीला धडक दिली. यामध्ये दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला. अपघात झाल्यानंतर कार चालक पळून गेला. ही घटना सोमवारी (दि. ३०) पहाटे चांदखेड येथे घडली.
किरण मच्छिन्द्र टापरे (वय ४३, रा. नवी सांगवी) यांनी शिरगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार कार (एमएच १४/जीएच ६९०७) चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी किरण हे त्यांच्या दुचाकीवरून चांदखेड येथून जात होते. त्यावेळी पाठीमागून आलेल्या कारने किरण यांच्या दुचाकीला जोरात धडक दिली. त्यामध्ये किरण हे गंभीर जखमी झाले. अपघात झाल्यानंतर कार चालक पळून गेला. शिरगाव पोलीस तपास करीत आहेत.