कारची काच फोडून लॅपटॉप चोरीला

0
189

भोसरी, दि. ५ (पीसीबी) – दुकानासमोर पार्क केलेल्या कारच्या काचा फोडून कारमधून लॅपटॉप, रोख रक्कम चोरून नेली. ही घटना शनिवारी (दि. 3) दुपारी इंद्रायणी नगर एमआयडीसी भोसरी येथे घडली.

चंद्रतेज मल्लिकार्जुन शिंदे (वय 22, रा. प्राधिकरण निगडी) यांनी याप्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी शिंदे यांनी त्यांची कार इंद्रायणी नगर येथील जे बी हार्डवेअर या दुकानाच्या मोकळ्या जागेत पार्क केली होती. शिंदे यांच्या कारची काच फोडून चोरट्याने 15 हजार रुपये किमतीचा लॅपटॉप, 80 हजार रुपये रोख रक्कम आणि 500 रुपये किमतीची एक बॅग चोरून नेली. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.