भोसरी, दि. १० जुलै (पीसीबी) – पिंपरी-चिंचवड शहरातील गोरगरीब नागरिकांनाही ‘आखाड पार्टी’ साजरी करता यावी. आपल्या मित्र परिवारासह कार्यकर्त्यांना वर्षातून एकवेळ सामिष्ट पाहुणचार द्यावे. याकरिता आमदार महेश लांडगे यांच्या पुढाकाराने आयोजित केलेल्या आखाड पार्टीत तब्बल ४ टन मटन, २ टन चिकन फस्त करण्यात आले. विशेष म्हणजे, ‘कम्युनिटी किचन’च्या धर्तीवर भोसरी विधानसभा मतदार संघात एकूण १३ ठिकाणी भोजन व्यवस्था करण्यात आली. त्यामध्ये सुमारे १ लाख ३७ हजार गोरगरिब नागरिक आणि पिंपरी-चिंचवडकरांनी आखाड भोजनाचा आस्वाद घेतला. त्यामुळे आमदार लांडगे यांची ‘आखाड पार्टी’ महाराष्ट्रातील ‘रेकॉर्ड ब्रेक’ ठरली आहे.
पिंपरी-चिंचवडमध्ये देशातील सर्वात मोठी बैलगाडा शर्यत पार पडली होती. यामुळे याकडे देशाभरातील शेतकऱ्यांचे लक्ष वेधले होते. महाराष्ट्रात आखाड महिन्यात आप्तेष्टांना सामिष्ट भोजनासाठी निमंत्रित करण्याची प्रथा आहे. मांसाहारी नागरिकांमध्ये आखाडाची विशेष रुची असते. त्यामुळे कोणताही कार्यक्रम ‘ग्रँड सेलिब्रेशन’ करण्याची हातोटी असलेल्या आमदार लांडगे यांच्या समर्थकांनी संपूर्ण भोसरी विधानसभा मतदार संघात यावर्षीचा आखाड एकत्रितपणे आणि सर्वसामान्य नागरिकांच्या सोबतीने उत्साहात साजरा केला. तसेच, कोणतेही मध्यपान किंवा गैरप्रकार होणार नाही. याची आयोजकांनी पूर्ण काळजी घेतली.
काच वेळी १३ ठिकाणी मेजवाणी…
एकाच दिवशी एका वेळी १३ ठिकाणी दिलेली ही सर्वात मोठी ‘मेगा आषाढ मेजवानी’ ठरली आहे. आमदार लांडगे समर्थक माजी नगरसेवक व पदाधिकाऱ्यांकडे आखाड पार्टीच्या नियोजनाची जबाबदारी होती. भोसरीतील संत तुकाराम मंगल कार्यालय, प्रभू रामचंद्र सभागृह, गव्हाणेवस्ती, पर्ल बँक्वेट, इंद्रायणीनगर, ओंकार लॉन्स, सिव्हर गार्डेनिया, बोऱ्हाडेवाडी, मोशी, जय गणेश लॉन्स शेजारी, मोशी, गंधर्वनगरी फेज-२, मोशी, चंद्रभागा गार्डन, जाधववाडी, खंडू सगळे गोडाऊन, रुपीनगरी, तळवडे, निलेश भालेकर जनसंपर्क कार्यालय, त्रिवेणीनगर, पेरुमल पिल्ले हॉल, रसरंग चौक, अजमेरा, बापु घोलप फार्म हाऊस, सहयोगनगर, निगडी अशा ठिकाणी सामूदायिक भोजन व्यवस्था करण्यात आली होती.
श्रावण हा सण-उत्सावाचा पवित्र महिना म्हणून ओळखला जातो. या काळात महिना-दीड महिना वातावरणातील बदल आणि हिंदू धर्माप्रमाणे मांसाहार वर्ज आहे. त्याआधी आषाढ महिन्यात मांसाहार करण्याची एक परंपरा आहे. त्यामुळे सर्वच ठिकाणी आखाड साजरा केला जातो. मतदार संघातील गोरगरिब, कष्टकरी, चाकरमानी यांच्यासोबत एकत्रितपणे आखाड पार्टी करण्यासाठी आम्ही १५ वर्षांपासून सुरूवात केली. त्याला आता भव्य स्वरुप प्राप्त झाले आहे. आपुलकीने नागरिक या सामिष्ट स्नेहभोजनासाठी सहभागी होतात. याचे समाधान वाटते.