काय झाडी, काय डोंगार फेम आमदार शहाजी पाटील दुर्घटनेतून थोडक्यात बचावले

0
172

पुणे,दि.७ (पीसीबी) – काय झाडी, काय डोंगार, काय हाटील समदं ओक्के हाय’ या वाक्यामुळे चर्चेत आलेले सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील एका दुर्घटनेतून थोडक्यात बचावले आहेत. याबाबतचे वृत्त बीबीसी न्यूज मराठीने दिलं आहे.

त्यांच्या मुंबईतल्या आमदार निवासातील खोलीत बुधवारी (6 जुलै) मध्यरात्री मोठा अपघात झाला. मुंबईतली सर्व कामं आटोपून शहाजीबापू पाटील रात्री उशीरा त्यांच्या खोलीवर पोहोचले. पण, त्यांनी दरवाजा उघडला आणि त्यांच्या खोलीचं छप्पर खाली कोसळलं.

महत्त्वाचं म्हणजे हे छप्पर शहाजीबापू यांच्या बेडवरच कोसळलं आहे. त्यांच्या सहकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, “बुधवारी रात्री ते रुमवर आले त्यांनी दरवाजा उघडला आणि स्लॅब खाली कोसळला. ते थोडक्यात बचावले. त्यानंतर आमदार निवासात रात्री दुसरी खोली आम्ही मॅनेज केली. पण रात्रभर आम्हाला खूप त्रास झाला.” दक्षिण मुंबईत मंत्रालयाजवळच्या आकाशवाणी आमदार निवासात ही घटना घडली आहे. यापूर्वी मनोरा आमदार निवासात आमदारांच्या खोल्यांमध्ये अशा काही घटना घडल्या होत्या.