काम सोडून जाणाऱ्या कामगारास मारहाण

0
451

पिंपळे गुरव,दि.०५(पीसीबी) – काम सोडून जाणार असलेल्या कामगाराला जाणीवपूर्वक भांडणे करून बेदम मारहाण केली. तसेच दुसरीकडे कामाला गेल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. ही घटना 14 सप्टेंबर रोजी सृष्टी चौक, पिंपळे गुरव येथे घडली. याप्रकरणी 4 डिसेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मनु वासू नायर (वय 52, रा. सृष्टी चौक, पिंपळे गुरव) यांनी याप्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार मोईन मिया तांबोळी (वय 22), सदाम मिया तांबोळी (वय 25), मिया तांबोळी (वय 49), बिहारी मुलगा (वय 25, सर्व रा. सृष्टी चौक, पिंपळे गुरव) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी मिया तांबोळी याचे सृष्टी चौकात गॅरेज आहे. त्यात फिर्यादी काम करत होते. काही कारणांमुळे ते गॅरेज मधील काम सोडून जाणार होते. याबाबत आरोपींना समजले. त्या कारणावरून आरोपींनी नायर यांची चप्पल लपवून ठेवली. त्यावरून मुद्दाम भांडण काढून शिवीगाळ करत हाताने मारहाण केली. मोईन तांबोळी याने नायर यांच्या डोळ्यावर मारून जखमी केले. तसेच दुसरीकडे कामाला गेल्यावर तुला मारतोच, अशी धमकी दिली. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.