काम बंद करा म्हणत कंपनीत राडा

0
56

हिंजवडी, दि. 03 (पीसीबी) : काम बंद करा असे म्हणत चार जणांनी मिळून पण राडा घातला. एका कामगार तरुणाला मारहाण केली. ही घटना सोमवारी (दि. 2) दुपारी एक वाजताच्या सुमारास व्ही मोटो कंपनी जांबे येथे घडली.

पवन राकेश सरोज (वय 23, रा. जांबे, मुळशी) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अनिल बारणे, योगेश ढाके, प्रशांत खळदकर, प्रशांत पाबलकर (रा. कासारवाडी, पुणे) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी काम करत असलेल्या कंपनीमध्ये आरोपी आले. त्यांनी मोठमोठ्याने आरडाओरडा करून काम बंद करा असे सांगितले. फिर्यादी आरोपींच्या समोर गेले असता आरोपींनी त्यांना हाताने लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. कंपनीत काम करायचे नाही असे म्हणून प्लायवूडच्या तुकड्याने डोक्यात मारून जखमी केले. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.