कामास मज्जाव करत शेतकऱ्याला लोखंडी रॉडने मारहाण

0
119

तळेगाव, दि. २३ (पीसीबी) : तू इथे काम करायचे नाही म्हणून शेतकऱ्याला लोखंडी रॉडने मारहाण केली आहे. हे घटना 22 सप्टेंबर रोजी मावळ येथील जांभवडे परिसरात घडली.

याप्रकरणी नवनाथ बबन कोयते (वय 43 रा.तळेगाव दाभाडे) यांनी तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.फिर्यादीवरून पोलिसांनी हरिभाऊ वैजनाथ केंद्रे, शशिकांत रामलिंग, सुरवसे प्रदीप पोपट भसे यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे मामेभाऊ हे जांभवडे येथील गट क्रमांक 93 मध्ये वॉल काउंट चे काम करत होते. यावेळी फिर्यादी तिथे जाऊन काम करत असताना आरोपी तिथे आले व तू इथे काम करायचं नाही काम थांबव म्हणून त्यांनी लोखंडी रॉडने फिर्यादी यांना मारहाण केली. दमदाटी करत धमकी दिली.यावरून तळेगाव एमआयडिसी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.