कामासाठी बोलवण्यास आलेल्या मालकावर कात्रीने हल्ला

0
10

हिंजवडी,दि.25 (पीसीबी)

खानावळी मध्ये काम करणाऱ्या महिलेला कामावर बोलावण्यासाठी मालक तिच्या घरी गेला. यावेळी महिलेच्या पतीने खानावळ मालकावर कात्रीने जीवघेणा हल्ला केला. यामध्ये खानावळ मालक गंभीर जखमी झाला आहे. ही घटना सोमवारी (दि. 23) रात्री साडेनऊ वाजताच्या सुमारास शिंदे वस्ती मारुंजी येथे घडली.

प्रोसनजीत लालमोहन बिश्वास (वय 33, रा. शिंदे वस्ती, मारुंजी) असे जखमी व्यक्तीचे नाव आहे. त्यांनी या प्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार शुभंकर चंदन मंडल (वय 28, रा. शिंदे वस्ती, मारुंजी) याला पोलिसांनी अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी बिश्वास हे मारुंजी येथे खानावळ चालवतात. शुभंकर मंडल याची पत्नी बिश्वास यांच्या खानावळीमध्ये काम करते. तिला बोलावण्यासाठी बिश्वास तिच्या घरी गेले. त्यावेळी त्यांच्यात अर्थशाब्दिक वाद झाला. यावरून शुभंकर याने बिश्र्वास यांच्यावर कात्रीने हल्ला करत त्यांना गंभीर जखमी केले. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.