कामावर वेळेत ये म्हटल्याने वरिष्ठाला मारहाण

0
47

महाळुंगे, दि. 24 (पीसीबी) : कंपनीतील वरिष्ठाने एका कामगाराला कामावर वेळेत ये, असे म्हटले. त्या कारणावरून कामगाराने वरिष्ठाला बेदम मारहाण केली. ही घटना गुरुवारी (दि. 21) सायंकाळी सात वाजताच्या सुमारास निघोजे गावातील निर्मल पॉली प्लास्टिक इंडस्ट्रीज कंपनीच्या समोर घडली.

मयूर हनुमंत शिर्के (वय 30, रा. हिवरे कुंभार, ता. शिरूर) यांनी महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार गणपत कुशाल लांडे (वय 26, रा. चिखली) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि आरोपी दोघे एकाच कंपनीत काम करतात. फिर्यादी शिर्के यांनी आरोपी गणपत याला फोन करून सायंकाळी सात वाजता वेळेत कामावर ये, असे सांगितले. आरोपीने आपल्याला रात्री एक वाजतील असे म्हटले. त्यामुळे तू कामावर आला नाहीस तरी चालेल, असे शिर्के यांनी सांगितले. त्या कारणावरून गणपत याने शिर्के यांना कंपनीच्या गेटवर अडवून बेदम मारहाण केली. ‘तुला जिवंत सोडणार नाही. तुझ्यावर व कंपनीवर खोट्या केस करतो’ अशी गणपत याने धमकी दिली. महाळुंगे एमआयडीसी पोलीस तपास करीत आहेत.