कामाठीपुरामध्ये ७८ मजली बिल्डिंग उभारण्याचा प्लॅन सरकारकडे

0
51

मुंबई, दि. २ : कामाठीपुराचा चेहरा-मोहरा बदलण्याची योजना प्रशासनाने आखली असून सरकारी प्रोजक्ट अंतर्गत सर्वात उंच बिल्डिंग उभारण्याचा सरकारचा प्लॅन आहे. महाराष्ट्र गृहनिर्माण क्षेत्र विकास प्राधिकरण अर्थात म्हाडाने कामाठीपुरामध्ये ७८ मजली बिल्डिंग उभारण्याचा प्लॅन सरकारकडे पाठवला आहे. सरकारने जवळपास ३९ एकर परिसरातील विकासाची जबाबदारी म्हाडाकडे सोपावली आहे. पुनर्विकासादरम्यान म्हाडा इथे राहणाऱ्या ६ हजार पात्र कुटुंबांना मोफत घर देणार आहे.

दुसरीकडे म्हाडा गोरेगावमध्ये ३० मजली सर्वात उंच इमारत उभारणार आहे. तसंच बीडीडी चाळ प्रोजेक्ट अंतर्गत म्हाडा वरळीमध्ये ६६ मजली इमारत तयार करत आहे. बीबीडी चाळीत ६६ मजली इमारतीनंतर म्हाडाची दुसरी सर्वात मोठी उमारत ७८ मजली कामाठीपुरामध्ये असणार आहे. मुंबईत जागेची कमतरता असल्यामुळे कमी जागेत अधिकाधिक लोकांना जागा देण्यासाठी म्हाडा आता खासगी बिल्डरप्रमाणे उंच इमारती बांधण्याच काम करत आहे.

काय आहे म्हाडाचा प्लॅन?
म्हाडाने कामाठीपुरामध्ये दोन प्रकारच्या इमारती उभारण्याची योजना आखली आहे. स्थानिक नागरिकांसाठी ५८ मजली अशा १० इमारती उभारल्या जाणार आहेत. तर या प्रोजेक्टमध्ये खर्च होणाऱ्या वसुलीसाठी ७८ मजल्याच्या ८ इमारती उभारणार आहेत. ७८ मजली इमारतीच्या घरांची विक्री म्हाडाद्वारे केली जाणार आहे.