कामाच्या ठिकाणी जाऊन महिलेचा विनयभंग, एकास अटक

0
381

बाणेर, दि. २१ (पीसीबी) – तू मला आवडतेस म्हणत महिलेशी बोलण्याचा प्रयत्न करत तिच्याशी गैरवर्तन करून तिचा विनयभंग केला. याप्रकरणी एकाला पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना शनिवारी (दि. 20) सकाळी बाणेर येथे घडली.

संदिप बाळू कांबळे (वय 35, रा. तुळापूर, ता. हवेली) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पीडित महिलेने हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी व फिर्यादी हे दोघे एकमेकांच्या ओळखीचे आहेत. शनिवारी सकाळी फिर्यादी बाणेर येथील एका सोसायटीमध्ये कामासाठी गेल्या होत्या. त्यावेळी आरोपी तिथे आला. त्याने फिर्यादीला फोन करून बाहेर बोलावून घेतले. सार्वजनिक रोडवर बोलावून तिच्याशी लगट करण्याचा आरोपीने प्रयत्न केला. महिलेने आरोपीला विरोध केला असता, तू मला खूप आवडतेस. आपली ओळख आहे. मग तू माझ्याशी का बोलत नाहीस, अशी विचारणा केली. महिलेने विरोध केला असता आरोपीने तिच्याशी गैरवर्तन करून तिचा विनयभंग केला. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.