कामाचे पैसे दिले नाहीत म्हणून एका तरुणाला मारहाण करत धमकी देण्यात आली आहे. ही घटना मंगळवारी (दि.23) लक्ष्मी चौक, मुळशी येथे घडली आहे,
याप्रकरणी भरत पन्ना सिंह (वय 28 रा. मुळशी) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरून विक्रम परमार (वय 28 रा. मुळशी) याच्यावर गुन्हा दाखल केला होता.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांना त्यांच्या कामाचे पैसे दिले नाहीत म्हणून पैसे मागण्यासाठी आरोपीकडे गेले होते. यावेळी आरोपीने फिर्यादीच्या दोन्ही हातावर दगड मारहाण करत जखमी केले व धमकी दिली. यावरून हिंजवडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.











































