कामगार मुलांनी चोरले मालकीणीचे मंगळसुत्र

0
234

काळेवाडी, दि. १२ (पीसीबी) – काम करणाऱ्या मुलांनी घरातील कपाटातून सोन्याचे मंगळसुत्र चोरल्याची घटना घडली आहे. ही चोरी 30 फेब्रुवारी 2024 रोजी दुपारी काळेवाडी येथे घडली आहे, यावरून महिलेने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे, त्यावरून वाकड पोलीस ठाण्यात दोन अल्पवयीन मुलांवर गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्याकडे कामाला असलेल्या दोन मुलांनी फिर्यादींच्या कापाटातून 90 हजार रुपयांचे सोन्याचे मणी मंगळसुत्र चोरून नेले आहेत. यावरून वाकड पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पोलीस पुडील तपास करत आहेत.