कामगार महिलेला जास्त काम सांगितल्याने एकास मारहाण

0
6

पिंपरी, दि.25 (पीसीबी)

कामगार महिलेला जास्त काम सांगितले असे म्हणत दोघांनी एका तरुणाला बेदम मारहाण केली. ही घटना सोमवारी (दि. 23) रात्री साडेनऊ वाजताच्या सुमारास झुलेलाल मंदिर, पिंपरी येथे घडली.

मंगेश सुनील जाधव (वय 19, पिंपरी) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार क्रिश पिंटू भुरुंगे (वय 18, रा. पिंपरी), सिद्धू राम अंगरक (वय 18, पिंपरी) आणि त्यांचा अनोळखी साथीदार यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी क्रिश आणि सिद्धू हे मंगेश जाधव यांच्याकडे आले. मंगेश यांच्यासोबत काम करणाऱ्या एका महिलेला त्यांनी जास्त काम सांगितले असे म्हणत आरोपींनी त्यांना फरशीने बेदम मारहाण केली. यामध्ये मंगेश गंभीर जखमी झाले आहेत. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.