कामगार, महिला, सर्वसामान्यांना दिलासा देणारा अर्थसंकल्प – – खासदार श्रीरंग बारणे

0
3

राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारचा यंदाचा अर्थसंकल्प कामगार, महिला, सर्वसामान्यांना दिलासा देणारा आहे. १२ लाख रुपयांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त केले आहे. हा मध्यमवर्गीय करदात्यांसाठी मोठा दिलासा आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी कर सवलत दुप्पट केली असून ५० हजारांवरून एक लाख रुपये केले आहेत. एससी, एसटीच्या महिला उद्योजकांसाठी विशेष कर्ज योजना आणली जाणार आहे. पहिल्यांदाच उद्योजक होणाऱ्या महिलांना दोन कोटी रुपयांपर्यंतचे कर्ज मिळण्याची तरतूद केली जाणार आहे. ३६ जीवरक्षक औषधे पूर्णपणे करमुक्त केली आहेत. वैद्यकीय उपकरणे आणि कर्करोगाची औषधे स्वस्त होतील. गरीब, युवा, अन्नदाता व नारी या चार घटकांच्या प्रामुख्याने सक्षमीकरणावर भर दिला आहे. किसान क्रेडिट कार्डची मर्यादा तीन लाख रुपयांवरून पाच लाख रुपये करण्यात आली आहे. पंतप्रधान धन-धान्य कृषी योजनेचा देशातील १०० जिल्ह्यांना फायदा होणार आहे. दुग्धव्यवसाय आणि मत्स्यपालनासाठी पाच लाख रुपयांपर्यंत कर्ज दिले जाणार आहे. केंद्रीय अर्थसंकल्पातून महाराष्ट्राला एमयुटीपी तीन प्रकल्पासाठी १४६५ कोटी ३३ लाख रुपयांचा निधी मिळाला आहे. पुणे मेट्रोसाठी ८३७ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. सरकारने अर्थसंकल्पात सोन्यावरील आयात शुल्क दहा टक्के कमी करण्याची घोषणा केली. त्यामुळे परदेशातून सोने आयात करणे दहा टक्के स्वस्त होईल. सरकारने इंटरअॅक्टिव्ह फ्लॅट पॅनल डिस्प्लेवरील शुल्क दहा टक्क्यांवरून २० टक्क्यांपर्यंत वाढवले आहे. विकसित भारताचा संकल्प पूर्ण करण्याच्या दिशेने घेवून जाणारा सर्वंकष असा आजचा केंद्रीय अर्थसंकल्प आहे.