कामगार कल्याण केंद्र उद्योग नगरच्या वतीने लहान मुलाला खाऊ वाटप

0
171

पिंपरी, दि. २७ (पीसीबी) – कामगार कल्याण मंडळ उद्योगनगरच्या वतीने 75 वा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. यावेळी भारतमातेच्या रक्षणासाठी प्राणाची अवती देणाऱ्या शहीद जवानांना प्रथम श्रद्धांजली वाहिली, कामगार कल्याण मंडळाचे केंद्र संचालक प्रदीप बोरसे यांनी राज्य शासनाच्या प्रशिक्षण योजना, शिष्यवृत्ती योजना, अशा वेगवेगळ्या योजनांची माहिती दिली. मंडळ राबवत असलेल्या वेगवेगळ्या आस्थापनात मध्ये जाऊन आरोग्य शिबिराचे आयोजन, महिला नाट्य स्पर्धा, बाल नाटक स्पर्धा, लोकनृत्य स्पर्धा, भजन स्पर्धा, कवी संमेलने,ताणतणाव पासून मुक्ती असे अनेक उपक्रम राबविले जातात, कामगारांच्या कुटुंबीयांसाठी व कामगारासाठी हे मंडळ विविध योजना राबवत आहे अशी माहिती त्यांनी दिली.आणि दोन.दिवसापूर्वी पुणे गटातून पाच जिल्हा तून आँनलाईन काव्यसंमेलन घेतले होते .कामगार कल्याण मंडळ उद्योगनगरचे सभासद व गुणवंत कामगार आण्णा जोगदंड यांना द्धितीय क्रमांक तर उत्तेजणार्थ याना मिळाल्याचे बोरसे यांनी सांगितले.

यावेळी गुणवंत कामगार अण्णा जोगदंड म्हणाले की पुणे गटात उद्योग नगरचे काम खूपच चांगले, केव्हाही ,कधीही प्रदीप बोरसे केंद्र संचालक कोणते प्रकारची माहिती हवी असल्यास कामगारांना त्त्वरीत देतात.कामगार कल्याण मंडळ जात, धर्म, पंथ असा भेदभाव न करता कामगाराच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले आहे. आणि सर्वांनी कामगार कल्याण योजनांचा कामगारांनी त्याचा फायदा करून घेण्याचे आवाहन जोगदंड यांनी केले.

समाजप्रबोधन कार शारदाताई मुढे यांनी चिमणी चिमणी पाखरे गित गाऊन सर्वांना मंत्रमुग्ध केले.स्वतंत्र मिळवण्यासाठी कित्येक आईने आपल्या मुलांना फासावर जातांना पाहिले आहे आणि मला जर 100 असे आसती तरी मी देशासाठी दिली आसती .अशा आमच्या भगिनी आहेत. सुरेश कंक यांनी देश स्वतंत्र झाला हा सहज न होता भगतसिंग, राजगुरू,सुखदेव यांच्या सारखे लढवय्याचा आम्हाला आभिमान आहे.

यावेळी. राज्यस्तरीय कराटे मध्ये, गोल्ड,सिल्व्हर, ब्राँझ मिळवलेल्या सोहम मुळीक, निधी दळवी, प्रनिती निचिते,रचीत हळदे,हर्षवर्धन नवले, रद्र शर्मा या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी टाटा मोटरचे सिनीअर व्यवस्थापक मयूर क्षिरसागर, गुणवंत कामगार, अण्णा जोगदंड,समाज प्रबोधनकार शारदाताई मुढे, मानवी हक्क संरक्षण आणि जाग्रतीचे कार्याध्यक्ष मुरलीधर दळवी, गुणवंत कामगार संगिता जोगदंड,महिला केंद्र प्रमुख दहीतुले अश्विनी जेष्ट साहित्यक सुरेश कंक. सुभाष चव्हाण,गुणवंत कामगार सुर्यकांत बरसावडे,सोमनाथ पतंगे, सतिश. देशमुख, उद्धव कुंभार, भाऊसाहेब गायकवाड अमोल लोंढे, प्रीमियर. कामगार संघटनेचे उपाध्यक्ष नितीन आकोटकर,विलो कंपनी चे राजदत झेंडे, मुस्तफा मुलानी ,संस्कृती कड, मछिंद्र कदम,एकनाथ उगले,प्रकाश वीर अशोक गोरे महाराज सह अनेक गुणवंत कामगार उपस्थित होते
प्रस्तावना सोमनाथ पतंगे यांनी सुत्रसंचालन मनोहर कड व आभार सुधाकर खुडे मानले.