कामगाराने पळवले एक लाख रुपये

0
145

पुणे, दि. ५ (पीसीबी) – टाईल्स बसवण्याचे काम करणाऱ्या कामगाराने काम सुरु असलेल्या घरातून एक लाख दोन हजार रुपये चोरून नेले. पोलिसांनी त्या कामगाराला अटक केली आहे. ही घटना गुरुवारी (दि. 1) राव कॉलनी, तळेगाव दाभाडे येथे घडली.

हितेश राजकुमार भगत (वय 20, रा. धावडेवस्ती, भोसरी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी विनोद कांजीभाई सापरीया (वय 52, रा. राव कॉलनी, तळेगाव दाभाडे) यांनी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सापरीया यांच्या घरात टाईल्स बसवण्याचे काम सुरु आहे. आरोपी हितेश भगत हा बिगारी काम करण्यासाठी गुरुवारी आला होता. गुरुवारी तो एकटाच काम करत होता. त्यावेळी त्याने घरात कोणी नसल्याचा गैरफायदा घेत हॉलमधील ड्रावरमधून एक लाख दोन हजार रुपये चोरून नेले. तळेगाव दाभाडे पोलीस तपास करीत आहेत.