कामगाराने पळवली अडीच लाखांची रोकड

0
305

दुकानात काम करणाऱ्या कामगाराने दुकानातून दोन लाख 45 हजार रुपयांची रोख रक्कम चोरून नेली. ही घटना 18 एप्रिल रोजी दुपारी पावणे एक ते सव्वा एक वाजताच्या कालावधीत दिघी येथील परफेक्ट मेन्स वेअर या दुकानात घडली.

विशाल अजय जाधव (वय 22, रा. चर्होली, ता. हवेली) यांनी याप्रकरणी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार ओम भंडारे (वय 21, रा. आदर्शनगर कॉलनी, दिघी) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी ओम हा फिर्यादी यांच्या दुकानात काम करत होता. त्याने 18 एप्रिल रोजी फिर्यादी यांच्या दुकानातून दोन लाख 45 हजारांची रोख रक्कम चोरून नेली. दिघी पोलीस तपास करीत आहेत.