कामगाराने केली साडेतीन लाखांची चोरी

0
342

चिंचवड, दि. १९ (पीसीबी) – पोल्ट्री व्यवसायातील मिळालेल्या रक्कमेतून कामगाराने साडेतीन लाख रुपये चोरी केले. ही घटना 7 नोव्हेंबर रोजी चिंचवडेनगर, चिंचवड आणि बजरंगनगर, ता. खानापूर, जि. सांगली येथे घडली.

मनोज शंकर चव्हाण (वय 35, रा. पाटील वस्ती, ता. खानापूर, जि. सांगली) असे गुन्हा दाखल झालेल्या कामगाराचे नाव आहे. याप्रकरणी निलेश गणपती राठोड (वय 41, रा. बजरंगनगर, विटा, ता. खानापूर, जि. सांगली) यांनी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी निलेश राठोड यांचा पोल्ट्री व्यवसाय आहे. त्यांच्याकडे मनोज चव्हाण हा काम करतो. राठोड यांनी चिंचवड येथील अजित एग्ज येथे अंडी पाठवली होती. त्याचे पैसे घेण्यासाठी राठोड यांनी त्यांचा कामगार मनोज चव्हाण याला पाठवले. मनोज याने चिंचवड येथून सचिन शेळके यांच्याकडून अंड्याचे पैसे घेतले. त्यातील तीन लाख 50 हजार रुपये त्याने संमतीशिवाय स्वतःकडे ठेऊन घेत चोरी केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. चिंचवड पोलीस तपास करीत आहेत.