कामगारानेच केला दुकानातील अडीच लाखांच्या दागिन्यांवर हात साफ

0
147

भोसरी, दि. 16 जुलै (पीसीबी) – सोन्याच्या दुकानात काम करणाऱ्या कामगाराने काम करण्याच्या बहाण्याने दुकानातील 2 लाख 40 हजार रुपयांचे दागिने चोरले आहेत. ही घटना भोसरी येथील वर्धमान ज्वेलर्स येथे 12 जुलै 2024 रोजी उघडकीस आली.

याप्रकरणी रोशन अमृतलाल जैन (वय 42 रा.भोसरी) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.यावरून योगेश रामेश्वर जाधव (वय 29 रा. दिघी) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या वर्धमान ज्वेलर्स येथे आरोपी हा काम करत होता.ग्राहकांना सोने दाखवण्याच्या बहाण्याने त्याने दुकानातून 80.870 ग्रॅम वजनाचे 2 लाख 40 हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरल्याचे उघडकीस आले आहे. यावरून भोसरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.