कामगाराच्‍या मृत्‍यूप्रकरणी एकावर गुन्‍हा

0
10

भोसरी, दि.26 (पीसीबी)
काम करीत असताना उंचावरून पडल्‍याने एका कामगाराचा मृत्‍यू झाला. याप्रकरणी एकावर गुन्‍हा दाखल करण्‍यात आला आहे. ही घटना १५ डिसेंबर रोजी १५ डिसेंबर रोजी दुपारी दोन वाजताच्‍या सुमारास तापकीरनगर, मोशी येथे घडली.

आकाशकुमार यादव (वय १९, रा. तापकिरनगर, मोशी. मूळगाव ग्राम व पो. सिसई, ता. गोरया गोसी जि. सिवान राज्य बिहार) असे मृत्‍यू झालेल्‍या कामगाराचे नाव आहे. पोलीस हवालदार किशोर रघुनाथ वाव्हळ (वय ५१) यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्‍यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी गणेश सयाजी वाडेकर (वय ३४, रा. पदमावतीनगर, चिंबळी) याच्‍या विरोधात गुन्‍हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्‍या माहितीनुसार, एक्सलंट इंजिनिअर शॉप, तापकीरनगर मोशी येथे पत्र्याच्‍या शेड फेब्रीकेशचे काम करीत असताना मयत आकाश हा उंचावरून टाकीवर पडल्‍याने त्‍याच्‍या डोक्‍याला मार लागून त्‍याचा मृत्‍यू झाला. आरोपी गणेश वाडेकर याने उंचावर काम करीत असताना मयत आकश याला संरक्षणाचे साधने त्यामध्ये सेफ्टी बेल्ट, हेल्मेट, सेफ्टी शूज व उंचावरील काम करते वेळी सदर शेडला खाली संरक्षण जाळी न बसवता निष्काळजीपणे त्याला काम करण्यास लावून त्‍याच्‍या मृत्‍यू कारणीभूत झाला. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.