कामगाराच्या पगारावर मारला डल्ला

0
124

रावेत,दि. २१ ऑगस्ट (पीसीबी )

ओळखीच्या व्यक्तीने कामगारांच्या एक लाख 46 हजार 500 रुपयांच्या पगारावर डल्ला मारला. ही घटना 9 जुलै 2024 रोजी दुपारी साडेचार वाजताच्या सुमारास पुनावळे येथे घडली.

नागनाथ दत्ता सोरगे (रा. कळंबर बुद्रुक, नांदेड) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. सुर्यकांत भालचंद्र पांचाळ (वय 42, रा. सिंहगड रोड, पुणे) यांनी रावेत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी पांचाळ हे कामगारांचा पगार करण्यासाठी एक लाख 46 हजार 500 रुपये घेऊन चालले होते. ते पुनावळ येथील लंडन ब्रीजजवळ आले असता त्यांची दुचाकी पंक्चर झाली. त्यामुळे त्यांनी आपल्याकडील पैशाची पिशवी आरोपी सोरगे याच्याकडे दिली व ते पंक्चर काढण्यासाठी गेले. त्यावेळी आरोपी सोरगे हा पैशाची पिशवी घेऊन पळून गेला. फिर्यादी यांनी त्याच्या फोनवर संपर्क केला असता फोन बंद आला. आरोपीच्या गावाकडे चौकशी केली असता तिथेही आरोपीबाबत काही माहिती मिळाली नाही. रावेत पोलीस तपास करीत आहेत.