कामगाराची नजर चुकवून ज्वेलर्स शॉप मधून 40 हजारांचे दागिने लंपास

0
260

चिखली, दि.४ (पीसीबी) – ज्वेलर्स शॉप मध्ये ग्राहक म्हणून आलेल्या दोन महिलांनी सेल्समन महिलेची नजर चुकवून 40 हजारांचे दागिने चोरून नेले. ही घटना शनिवारी (दि. 30) सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास चिखली मधील लक्ष्मी ज्वेलर्स या दुकानात घडली.

याप्रकरणी सेल्समन महिलेने चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दोन अनोळखी महिलांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या चिखली मधील लक्ष्मी ज्वेलर्स या दुकानात सेल्समन म्हणून काम करतात. शनिवारी सायंकाळी त्यांच्या दुकानात दोन महिला दागिने खरेदीच्या बहाण्याने आल्या. त्यांनी नाकातील जाडसर डिझाईनच्या चमकी दाखवा, असे फिर्यादीस सांगितले. त्यानुसार फिर्यादी महिला दुकानातील प्लास्टिकच्या डब्यातील सोन्याच्या चमकी दाखवत होत्या. त्यावेळी त्यांची नजर चुकवून ग्राहक बनून आलेल्या महिलांनी 40 हजार रुपये किमतीचे 13 ग्रॅम 360 मिलिग्रॅम वजनाचे सोन्याच्या चमकीचे एक पाकीट चोरून नेले. चिखली पोलीस तपास करीत आहेत.