कामगाराची नजर चुकवून एक लाख ६० हजारांचे दागिने पळवले

0
198

पिंपरी, दि. २० (पीसीबी) – ज्वेलर्सच्या दुकानात काम करणाऱ्या कामगाराची नजर चुकवून ग्राहक बनून आलेल्या तिघांनी एक लाख ६० हजारांचे दागिने चोरून नेले. ही घटना बुधवारी (दि. १८) सायंकाळी संत तुकाराम नगर पिंपरी येथील कैलास ज्वेलर्स येथे घडली.

हंसराज प्रेमराज चौधरी (वय ३८, रा. संत तुकाराम नगर, पिंपरी) यांनी याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दोन महिलांसह तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी चौधरी यांचे संत तुकाराम नगर येथे ज्वेलर्स दुकान आहे. बुधवारी सायंकाळी चार वाजताच्या सुमारास तिघेजण चौधरी यांच्या दुकानात ग्राहक बनून आले. दुकानातील कामगाराची नजर चुकवून ३८.९८० रुपये किमतीचे एक लाख ६० हजारांचे दागिने चोरून नेले. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.