कामगारांच्या प्रश्नासाठी भूमि अभिलेख कर्मचारी कृति समिती स्थापनाराज्यस्तरीय कृती समितीवर सुरज रामटेके, पवन केवटे, दिपाली मुरकुटे यांची निवड

0
2

पिंपरी, दि. ५ : विदर्भ लँड रेकॉर्डस् स्टाफ असोसिएशन अमरावती, महाराष्ट्र राज्य भूमि अभिलेख तांत्रिक कर्मचारी संघटना, कास्ट्राईब कर्मचारी संघटना यांच्या वतीने शनिवारी बैठक झाली. त्यात भूमि अभिलेख कर्मचारी कृति समिती महाराष्ट्र राज्य संघटनेची स्थापना झाली. कर्मचा-यांवरील अन्यायाला वाचा फोडण्यासाठी संघटनांची एकजूट झाली. चर्चा झाली. त्यावर सुरज रामटेके, पवन केवटे, दिपाली मुरकुटे यांची वर्णी लागली आहे.

महाराष्ट्र राज्य भूमि अभिलेख कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष रमेश सरकटे, कास्ट्राईब कर्मचारी संघटनेचे राज्य सरचिटणीस रविंद्र कांबळे, महाराष्ट्र राज्य भूमि अभिलेख तांत्रिक कर्मचारी संघटनेचे राज्य सरचिटणीस अभय पाटील यांच्यासह महाराष्ट्र राज्य भूमि अभिलेख मुंबई विभाग व नाशिक विभाग संघटना, मंत्रालयीन संघटना या संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. राज्यस्तरीय कृती समितीवर पवन केवटे, दिपाली मुरकुटे, सुरज रामटेके, विभूतीचंद्र गजभिये, सुनील गोडसे, विवेक कोठाळे, राहुल पाटील, कमलाकर पोद्दार , किशोर इंगळे, संजय बोर्डे यांची निवड करण्यात आली आहे.

काय आहेत मागण्या
भूमि अभिलेख कर्मचारी कृती समितीच्या माध्यमातून राज्यातील समस्त कर्मचारी यांचे प्रश्न व अडचणीबाबत शासनस्तरावर पाठपुरावा करण्यात येणार आहे. अध्यक्ष रमेश सरकटे म्हणाले, नागपूर येथील महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधीकरण यांनी भूमी अभिलेख विभागातील तांत्रिक कर्मचा-यांना तांत्रिक वेतनश्रेणी लागु करावी, अशा सूचना केल्या आहेत. राज्यभरात या मागणीसाठी अनेकवेळा आंदोलने झाली. बैठका झाल्या. मात्र, शासनाने अद्याप वेतनश्रेणी लागु केली नाही. विभागात हजारो रिक्त पदे आहेत, सुधारीत आकृतीबंदाला शासन स्तरावरुन मान्यात मिळत नाही, त्याचबरोबर खाजगीकरण अशा अनेक विषयांसह शासनस्तरावर पाठपुरवा करण्यासाठी समितीची स्थापना केली आहे. कर्मचा-यांवरील अन्यायाला वाचा फोडण्यासाठी राज्यातील संघटना एकत्र आल्या आहेत.’