काढा करून न दिल्याने पत्नीला बेदम मारहाण

0
564

मोशी, दि. १९ (पीसीबी) – काढा करून दिला नाही, या कारणावरून पतीने पत्नीला बेदम मारहाण केली. याप्रकरणी पतीला पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना 27 ऑक्टोबर रोजी दुपारी बोऱ्हाडेवाडी मोशी येथे घडली.

अमोल शिरीष परदेशी (वय 39, रा. नागेश्वरनगर, बोऱ्हाडेवाडी, मोशी) असे अटक केलेल्या आरोपी पतीचे नाव आहे. याप्रकरणी अमोल याच्या पत्नीने एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांनी पती अमोल याला काढा करून दिला नाही, या कारणावरून अमोल याने पत्नी फिर्यादीस शिवीगाळ केली. त्यानंतर हाताने, लाथेने व लाकडी काठीने हातावर, पायावर, पाठीवर, डोक्यात मारून जखमी केले. पत्नीला गळा दाबून ढकलून दिले. काठीने हाताच्या मनगटावर मारून गंभीर जखमी केले. अमोल याने पत्नीला जीवे मारण्याची धमकी दिली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.