कागदपत्र तयार ठेवा, मनोज जरांगेचं मराठा समाजाला आवाहन; निवडणूक लढणार?

0
65

अंतरवाली सराटी, दि. 16 (पीसीबी) : कालच महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीची घोषणा केली गेली आहे. यानंतर आता राज्यात निवडणुकीचं वार वाहतं आहे. अशातच आता मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे देखील निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची चर्चा आहे. जालन्यात मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी मराठा समाजाला महत्वाचं आवाहन केलं आहे. कागदपत्र तयार ठेवा, असं जरांगे म्हणालेत. विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली आहे. अशातच आता मनोज जरांगे काय निर्णय घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. 20 तारखेला मनोज जरांगेंनी बैठक बोलावली आहे. या बैठकीत निवडणूक लढण्याबाबत निर्णय घेतला जाणार आहे.

20 ऑक्टोबर रोजी सकाळी 10 वाजता बैठक सुरू होईल. संध्याकाळी 4 वाजता ती बैठक संपन्न होईल. त्यादिवशी आपल्याला लढायचं की पडायचं हा निर्णय घ्यायचा आहे. पण मराठ्यांनी आतापासूनच सावध राहायचं आहे. सगळ्यांनी कागद पत्रासह सगळ्यांनी तयार राहा. जर लढायच ठरलं तर तुमच्याकडे 3 दिवस अर्ज भरण्यासाठी राहणार आहेत. जर या निवडणुकीत पडायचं ठरलं तर तुमचे कागद पत्र यावं जाणार आहेत. सगळ्यांनी 20 तारखेला अंतरवाली सराटीत डबे घेऊन या, असं आवाहन मनोज जरांगे यांनी केलं आहे

ज्यांनी निवडणुकीसाठी अर्ज केले आहेत, त्यांच्या सोबत मला चर्चा करायची आहे. उद्या महाराष्ट्रातील इच्छुक उमेदवारांनी अंतरवाली सराटीत यावं. सकाळी 9 ते सायंकाळी 4 वाजे पर्यंत चर्चेसाठी यावं. 2- 3 विषयांवर मला तुमच्यासोबत चर्चा करायची आहे. रविवारी 20 तारखेला मराठा समाजाची बैठक होणार आहे. त्या बैठकीला ज्याला जमेल त्याने यावं, कोणाला ही बळजबरी नाही. मला माझ्या समाजाला खर्चात टाकायचं नाही. पण वेळ आली तर आपल्याला लढावं लागेल, असं मनोज जरांगे म्हणालेत.