चिखली, दि. १७ (पीसीबी)- महापालिकेच्या कागदपत्रांमध्ये फेरफार करत वृक्षतोड केल्या प्रकऱणी एका 75 वर्षीय नागरिकावर गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे. ही घटना 11 जानेवारी रोजी कुदळवाडी चिखली येथे घडली आहे.
याप्रकरणी भाऊसाहेब विष्णू सगरे (वय 54 रा. पिंपरी) यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद मंगळवारी (दि.16) दिली आहे. यावरून चिखली पोलिसांनी प्रल्हाद परशुराम पवार (वय 75 रा.पिंपरी) याच्या विरोधात गुन्हा दाखल कण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपीने पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या कागदपत्रांमध्ये फेरफार करत बेकायदेशीर रित्या वृक्षतोड केली. यावरून चिखली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून पोलीस पुढील तपास करत आहेत.












































