कांद्याच्या पोत्यांच्या आडून होतीय गोमासांची तस्करी; तब्बल ८ टन गोमांसाची वाहतूक !

0
220

देहूरोड, दि. २१ (पीसीबी)- जिथे भारतीय संस्कृतीत गायीला माता म्हणून संबोधलं जात, त्याच भारतात मोठ्या प्रमाणात अवैध्य गोमासांची तस्करी केली जाते. पिंपरी-चिंचवड सारख्या औद्योगिक शहरात गोमांसाच्या तस्करीचा धंदा मोठ्या प्रमाणात वाढला आहे. काल दि. २० रोजी पहाटे देहूरोड पोलीस स्टेशनच्या हद्दीत अवैध्य गोमांसाची वाहतूक करणारा आयशर टेम्पो पकडण्यात आला. हा टेम्पो धाराशिव जि.परांडा गावातुन गायींचे मांस भरून मुंबई येथे जात असताना, शिवशंकर स्वामींनी देहूरोड पोलिसांच्या मदतीने तो टेम्पो ताब्यात घेऊन, कायदेशीर कारवाई केली.

महत्वाचे म्हणजे कांद्याच्या पोत्यांच्या आडून या गोमांसाची वाहतूक करण्यात येत होती. त्यावेळी त्यांच्याकडून १२ लाख ६० हजार रुपये किंमतीचे, तब्बल ८ टन गोमांस जप्त करण्यात आले. टेम्पोचालक रफिक पैगंबर पठाण याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून, या आयशर टेम्पोचे मालक शौकत हुसेन याच्यावर महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.

दरम्यान, या अवैध्य वाहतुकीबाबतची माहिती मानद पशुकल्याण अधिकारी शिवशंकर स्वामी यांनी दिली असून, याबाबतची फिर्याद देहूरोड पोलीस स्टेशनला दिली. शिवशंकर स्वामी यांना या अवैध्य वाहतुकीची माहिती मिळताच त्यांनी त्वरित आपल्या गोरक्षकांच्या साथीने तसेच पोलिसांच्या मदतीने या अवैध्य कारभाराला आळा घातला. या कारवाईत मानद पशुकल्याण अधिकारी शिवशंकर स्वामी यांच्यासह प्रतीक भेगडे, तानाजी असवले, अमित असवले, अभिषेक कडुसकर, हर्षद पारखे, शरद कोतकर, अथर्व सुकाळे, जय जाधव, प्रथमेश जाधव इ गोरक्षकांचा सहभाग होता.