काँग्रेस स्थापना दिनी स्नेहमेळावा उत्साहात संपन्न

0
234

पिंपरी, दि. ३० (पीसीबी) – भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या १३८ व्या स्थापना दिनानिमित्त (२८ डिसेंबर) पिंपरी चिंचवड शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने सर्वपक्षीय, सर्व क्षेत्रातील व्यक्तिमत्त्वांचा स्नेह मेळावा पिंपरी चौक येथे आयोजित करण्यात आला.

या स्नेहमेळाव्यास राजकीय, शैक्षणिक, पत्रकारिता, कला, क्रीडा, सहकार, साहित्य, वैद्यकीय, सामाजिक, प्रशासकीय, कामगार, विधी, तसेच इतरही क्षेत्रातील मान्यवर नागरिकांची उपस्थिती लाभली.

याप्रसंगी आलेल्या सर्व मान्यवरांचे काँग्रेसचे शहर अध्यक्ष डॉ.कैलास कदम यांच्या हस्ते शाल, पुष्पगुच्छ आणि स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.

याप्रसंगी देशभक्तीपर गीतांचा ऑर्केस्ट्रा सादर करण्यात आला त्याचप्रमाणे उपस्थितासाठी स्वागतपर पानसुपारी चहा पानाचे आयोजन करण्यात आले.

उपस्थिता मध्ये प्रामुख्याने पद्मश्री मुरलीकांत पेटकर, उपमहाराष्ट्र केसरी संभाजी राक्षे, मिस्टर इंडिया महाराष्ट्र श्री संदेश नलावडे, वर्ल्ड रेकॉर्ड लंडन मध्ये नोंद झालेले (अल्फाबीट) मधील श्रेयस जोशी (वय वर्ष ४) मक्का मशीदीचे सदर गुलजार भाई शेख, ख्रिस्ती समजाचे नेते ॲड. बाजीराव दळवी, इंद्रायणी सहकारी बँकेचे संस्थापक एस. वी. चांडक, निवृत्त सहायक आयुक्त इन्कम टॅक्स मुंबई सुरेश विटकर, माजी आमदार गौतम चाबुकस्वार, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे, नगरसेवक राजेंद्र जगताप, विनोद नढे, राहुल भोसले, शाम लांडे, विक्रांत लांडे, पंकज भालेकर,अनंत को-हाळे, अख्तर चोधरी, उर्मिला काळभोर, सुप्रिया सोलांकुरे, निर्मलाताई कदम, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते मानव कांबळे, मारुती भापकर, काशिनाथ नखाते, ओबीसी महासंघाचे अनंदा कुदळे, संभाजी ब्रिगेड चे गणेश दहीभाते, लहू लांडगे, सतीश काळे, मराठा सेवा संघाचे प्रकाश जाधव, छावा युवा संघटनेचे धनाजी येळकर पाटील, हाजी दस्तगीर मणियार, युसुफ कुरेशी,१६३ वेळा रक्तदान केलेले रक्तदाते संतोष ताम्हणकर, राहुल भोईर, रूनाल मॅक्सवल, हरीष नखाते, कुस्तीगीर संघटनेचे उपाध्यक्ष दिलीप काळे, अंध इंडिया टीम वर्ल्ड कप फुटबॉल मध्ये सहभाग झालेली कोमल गायकवाड, भाग्यश्री मूगी, दिपाली कांबळे, इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नक्षत्रांच्या अभ्यासामध्ये नोंद झालेली रत्नेश्वरी मुळी, बेस्ट फिल्म ज्यूरीचा बारावा दादासाहेब फाळके पुरस्कार ” इरगाल ” फिल्मचे रशीद निंबाळकर, बेस्ट फिल्म सोशल अवॉर्ड ” टिकटिक ” फिल्म चे डायरेक्टर तुषार बोकेफोडे, , ॲथलेटिक्स क्रीडा प्रकारातील राष्ट्रीय पंच प्रमोद मोरे, पौर्णिमा जाधव, इंडियन डेंटल असोसिएशनच्या डॉ.मनीषा गरुड ब्राह्मण समाज संघटनेचे पदाधिकारी डॉ. सचिन बोधनी, डॉ. संजीव संभुस, जैन समाज संघटनेचे पदाधिकारी अतुल धोका आदी व मान्यवर ही अनेक मान्यवरानी स्नेहमेळाव्यास भेट दिली.