काँग्रेस पदाधिकाऱ्याची पतसंस्था कार्यालयात आत्महत्या

0
225

पुणे, दि. २४ (पीसीबी) : पुणे जिल्ह्यातील काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी विकास टिंगरे यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. धानोरी येथील पोरवाल रस्त्यावर असलेल्या त्यांच्या पतसंस्थेच्या कार्यालयात विकास टिंगरे (वय ४९, रा. पोरवाल रस्ता, धानोरी, विश्रांतवाडी) यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. या आत्महत्येमागचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. विकास टिंगरे हे पुणे शहरातील विश्रांतवाडी भागाचे काँग्रेस पक्षाचे ब्लॉक अध्यक्ष होते. त्यांच्या आत्महत्येमुळे पुण्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धानोरी येथील पोरवाल रोडवर असलेल्या पतसंस्थेच्या कार्यालयात विकास टिंगरे हे नेहमीप्रमाणे मंगळवारी दुपारी पतसंस्थेत आले होते. विकास टिंगरे यांनी दुपारी जेवण केले नाही. त्यामुळे तेथील कर्मचार्‍यांनी ऑफिसमध्ये जाऊन पाहिल्यावर विकास टिंगरे यांनी गळफास घेतल्याचे दिसून आले. त्यांना तात्काळ जवळील रूग्णालयात दाखल करण्यात आले. त्यावेळी डॉक्टरनी त्यांना मृत घोषित केले केले. या घटनेची माहिती मिळताच विश्रांतवाडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. टिंगरे यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठविण्यात आला. टिंगरे यांच्या आत्महत्येमागचे कारण समजू शकले नाही. विश्रांतवाडी पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास करण्यात येत आहे.
संबंधित बातम्या