काँग्रेसने सांगितला पंतप्रधान पदाचा फॉर्मुला

0
123

लोकसभा निवडणुकीचा निकाल अगदी चार दिवसांवर येऊन ठेपला आहे. येत्या 4 जूनला निकाल लागणार आहे. मात्र निकालापूर्वी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनी एक मोठं आश्वासन जनतेला दिल आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीपूर्वीच राजकीय वर्तुळात चर्चाना उधाण आलं आहे.

लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडीला संपूर्ण बहुमत तर 48 तासातच पंतप्रधानाची निवड केली जाईल, असं काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनी स्पष्ट केलं आहे. तसेच ज्यांच्या जागा सर्वात जास्त असतील त्यांचा पंतप्रधान करण्यात येईल, असं म्हणत पंतप्रधान निवडण्याचा फॉर्म्युला देखील ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनी स्पष्ट केला आहे.

उद्या म्हणजेच 1 जूनला लोकसभा निवडणुकीच्या सातव्या टप्प्यासाठी मतदान होत आहे. त्यानंतर 4 जून रोजी लोकसभा निवडणुकीचा निकाल लागणार आहेत. या पार्श्वभूमीवर त्यांनी हा दावा केला आहे. याशिवाय इंडिया आघाडीला 272 पेक्षा अधिक जागा मिळणार असल्याचं देखील ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनी स्पष्ट केलं आहे.

इंडिया आघाडीची सत्ता आली तर एनडीएचे मित्र पक्ष आमच्या आघाडीत देखील येऊ शकतात. मात्र त्यावेळी त्यांना आघाडीत घ्यायचं की नाही? यासंदर्भात निर्णय काँग्रेसचे वरिष्ठ नेते घेतील असाही ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनी स्पष्ट केलं आहे. तसेच ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांना नीतीश कुमार आणि टीडीपी अध्यक्ष चंद्राबाबू नायडू यांच्यासाठी इंडिया आघाडीचे दरवाजे उघडे असतील का? असा प्रश्न विचारण्यात आला.

मात्र त्यावर देखील त्यांनी उत्तर दिलं आहे. नीतीश कुमार हे पलटी मारण्यात सर्वात जास्त माहीर आहेत. चंद्राबाबू 2019मध्ये काँग्रेस आघाडीत होते, असं जयराम रमेश म्हणाले आहेत. तसेच त्यांना इंडिया आघाडीत घ्यायचं की नाही हे सोनिया गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे हे ठरवतील. आम्हाला या निवडणुकीत मोठं यश मिळेल असा विश्वास ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनी व्यक्त केला आहे.