काँग्रेसची मोठी खेळी; विधानपरिषद निवडणूकीत भाजपला दिला पराभवाचा धक्का..

0
362

बंगळूरू : दक्षिण पदवीधर मतदारसंघातून विधान परिषदेच्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाने मतदारसंघातून प्रथमच विजय नोंदवून इतिहास रचला. काँग्रेसचे उमेदवार मधु मादेगौडा यांनी भाजपचे ( एम. व्ही. रविशंकर यांचा पराभव केला. तब्बल २९ तासाच्या मतमोजणीनंतर अधिकाऱ्यांनी निवडणूक निकाल गुरुवारी (ता.१६ जून) दुपारी जाहीर केला. या निकालाबरोबर काँग्रेस व भाजपला प्रत्येकी दोन जागांवर विजय मिळाला. धर्मनिरपेक्ष जनता दलाला मात्र या निवडणुकीत धक्का बसला.

प्राधान्य मतांच्या मोजणीनंतर मादेगौडा यांना ४५ हजार २७५ मते मिळाली. भाजप उमेदवाराला ३३ हजार ८७८ मते मिळाली. धजदचे उमेदवार एच. के. रामू यांना १९ हजार ३६० मतांसह तिसऱ्या क्रमांकावर जावे लागले. १५ जून रोजी सकाळी आठ वाजता सुरू झालेल्या मतमोजणीच्या सुमारे २९ तासांनंतर मादेगौडा यांना औपचारिकरित्या विजयी जाहीर केले. प्रादेशिक आयुक्त जी. सी. प्रकाश यांनी १६ जून रोजी दुपारी मतमोजणी केंद्रावर मादेगौडा यांना निवडणुकीचे प्रमाणपत्र सुपूर्द केले.

म्हैसूर, मंड्या, हसन आणि चामराजनगर जिल्ह्यात पसरलेल्या दक्षिण पदवीधर मतदारसंघातून विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी एकूण १९ उमेदवार रिंगणात होते. एकूण एक लाख ४१ हजार ९६३ मतदारांपैकी ९९ हजार ३०४ मतदान झाले.

धजदसाठी हा मोठा धक्का मानला जातो. जून २०१६ मध्ये झालेल्या मागील निवडणुकीत पक्षाने विजय मिळवला होता. विद्यमान आमदार के. टी. श्रीकांतेगौडा यांनी उमेदवारी दिली नाही. तर पक्षाने कर्नाटक राज्य सरकारी कर्मचारी संघटनेचे ऱ्यांच्या माजी अध्यक्ष एच. के. रामू यांना उमेदवारी दिली.