काँग्रेसची मोठी कारवाई, बनसो़डे, वाल्हेकर, डोळस निलंबीत

0
32

पिंपरी, दि. १३ (पीसीबी) – पिंपरी चिंचवड काँग्रेसमध्ये पक्ष विरोधात कारवाई केल्याबद्दल प्रदेश काँग्रेसने चौघांवर निलंबन कारवाई केली आहे.
विधानसभा निवडणूक पार्श्वभूमिवर ही कारवाई महत्वाची समजली जाते. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या आदेशानुसार ही कारवाई कऱण्यात आली आहे.
पिंपरी चिंचवड शहर (जिल्हा) कॉंग्रेस कमिटी अंतर्गत पक्ष विरोधी कारवाया करणाऱ्या शहर वरिष्ठ उपाध्यक्ष श्री. नरेंद्र बनसोडे, श्री. भरत शंकर वाल्हेकर, श्रीमती. सुप्रिया भरत वाल्हेकर, शहर सरचिटणीस श्री. हरिष बाजीराव डोळस पदाधिकाऱ्यांना प्रांताध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्या निर्देशावरून काँग्रेस पक्षातून पुढील ६ वर्षाकरीता निलंबीत करण्यात आले आहे.

विधानसभा निवडणुकिसाठी पिंपरी, चिंचवड आणि भोसरी या पैकी एकही मतदारसंघ काँग्रेसला सुटला नाही. शहरात काँग्रेसचे अस्तित्वच धोक्यात आल्याचे मत या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केले होते. शहराध्यक्ष कैलास कदम यांना बदलण्याची मागणी त्यांनी केली होती.