निवडणुका बॅलेट पेपरवर घेण्याची मागणीवर मेळाव्यात होणार चर्चा
पिंपरी, दि. 21 – काँग्रेसच्या पिंपरी-चिंचवड ओबीसी विभागाच्या वतीने जय संविधान, जय बापू, जय भिम हा ओबीसी मेळावा रविवारी (दि.25) सायंकाळी पाचला छत्रपती शिवाजी महाराज चौक, कुदळवाडी पुल, भोसले पेट्रोलपंपाजवळ आयोजित केला आहे. मेळाव्यात निवडणुका बॅलेट पेपरवर घ्याव्यात, संविधान सन्मान, संविधान बचावसाठी काँग्रेसची अग्रेसर भूमिका, राहुल गांधींमुळे देशात जातीनिहाय जनगणना होणार आदी मुद्दयांवर चर्चा करण्यात येणार आहे.
ओबीसी मेळाव्याचे उद्घाटन पक्षाचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ व विधीमंडळाचे गटनेते विजय वडेट्टीवार यांच्या हस्ते होणार आहे. प्रमुख पाहुणे म्हणून अखिल भारतीय काँग्रेस ओबीसी विभागाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. अनिलकुमार जयहिंद, विधानपरिषदेचे गटनेते सतेज उर्फ बंटी पाटील, अखिल भारतीय काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव प्रफुल्ल गुदडे पाटील, काँग्रेस ओबीसी विभागाचे प्रदेशाध्यक्ष भानुदास माळी, निर्भय बनोचे अॅड. असिम सरोदे, पक्षाचे शहराध्यक्ष डॉ. कैलास कदम, माजी महापौर कविचंद भाट, कामगार नेते विष्णूपंत नेवाळे, मिलिंद फडतरे, महिला शहराध्यक्षा सायली नढे, ओबीसी बारा बलुतेदार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष प्रतापराव गुरव, काँग्रेस ओबीसी विभागाचे शहर निरीक्षक प्रविण जांभळे, ओबीसी संघर्ष समितीचे अनंता कुदळे, आनंदा कुदळे, राहुल शिंपले, मुयर जैसवाल आदी उपस्थित राहणार आहेत.
आगामी महापालिका निवडणुकीसह देशातील सर्व निवडणुका बॅलेट पेपरवर घेण्यात याव्यात. संविधान सन्मान, संविधान बचावासाठी काँग्रेस अग्रेसर आहे. त्यासाठी विविध मोहिमा व उपक्रम राबविण्यात येणार आहेत. राहुल गांधी यांनी जातनिहाय जणगणना करण्यासाठी भाजपला भाग पाडले आहे. त्याचा देशाला होणार फायदा आदीं विषयावर या मेळाव्यात चर्चा केली जाणार आहे.
मेळाव्याचे मुख्य संयोजक काँग्रेस ओबीसी विभागाचे शहराध्यक्ष सोमनाथ शेळके यांनी केले आहे