काँक्रेट लिफ्ट मशीन चोरीला

0
484

चिंचवड, दि. २९ (पीसीबी) – काँक्रेट लिफ्ट मशीन चोरट्यांनी चोरून नेली. ही घटना मंगळवारी (दि. 26) सकाळी वाल्हेकरवाडी, चिंचवड येथे उघडकीस आली.

जावेद अल्लाबक्ष बागवान (वय 32, रा. बिजलीनगर, चिंचवड) यांनी याप्रकरणी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्याकडे दोन लाख रुपये किमतीची काँक्रेट लिफ्ट मशीन आहे. ती लिफ्ट मशीन फिर्यादी यांनी वाल्हेकरवाडी येथील हनी किडस शेजारी असलेल्या सार्वजनिक जागेत लावली होती. सोमवारी (दि. 25) सायंकाळी सात ते मंगळवारी सकाळी सहा वाजताच्या कालावधीत अज्ञात चोरट्यांनी फिर्यादी यांची लिफ्ट मशीन चोरून नेली. चिंचवड पोलीस तपास करीत आहेत.