कसब्यात महाआघाडीत मोठी बंडखोरी

0
225

पुणे, दि. ६ (पीसीबी) – सध्या राज्याच्या राजकारणात पुण्यातील पोटनिवडणुकांची रणधुमाळी पाहायला मिळत आहे. कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुका लवकर पार पडणार आहेत. कसबा मतदार संघातून कॉंग्रेसने उमेदवारी रवींद्र धंगेकर यांना दिली आहे. मात्र, कॉंग्रेसमध्ये अर्ज भरण्याबाबत बंडखोरी झाल्याचे पाहायला मिळाले.

पुणे शहर काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष बाळासाहेब दाभेकर कसब्यातून उमेदवारी अर्ज भरणार असल्याची माहिती समोर आली आहे.बाळासाहेब दाभेकर उद्या मंगळवार दि 7 फेब्रुवारी 2023 रोजी सकाळी 10 वाजता कसबा विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीचा उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.